अमळनेर : धुळे अल्पवयीन मुली आत्महत्या प्रकरणी धोबी समाजाचे निवेदन

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-07-13 at 12.22.55 PM

अमळनेर : धुळे अल्पवयीन मुली आत्महत्या प्रकरणी धोबी समाजाचे निवेदन

अमळनेर (जि. जळगाव), दि. १३ जुलै : धुळे शहरातील गोळीबार टेकडी परिसरात १५ वर्षीय जानवी जितेंद्र ठाकरे या अल्पवयीन मुलीने मानसिक छळाला कंटाळून केलेल्या आत्महत्येच्या प्रकरणी अमळनेर युवा परीट धोबी समाज व परदेशी धोबी समाजाने आज तीव्र संताप व्यक्त केला. समाज बांधवांनी एकत्र येत संबंधित प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत निवेदन दाखल केले. समाजाने मागणी केली आहे की, निष्पाप अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोषींवर तात्काळ कठोर कलमांनुसार गुन्हे दाखल करावेत, खटला विशेष जलदगती न्यायालयात चालवावा आणि दोषींना फाशीची शिक्षा व्हावी.यावेळी उपस्थित प्रमुख समाज बांधव :
रविद जाधव, विजय वाघ, उमेश वाल्हे, भरत जावदेकर, दिपक वाल्हे, गंगाराम वाल्हे, गणेश वाल्हे, अनिल मांडोळे, अनिल पवार, परशुराम महाले, सुरेशचंद्र येशी, विकी जाधव, अशोक येशी, अरूण जाधव, लक्ष्मण परदेशी, जयसिंग परदेशी, केशव परदेशी आदी. धोबी समाजाने स्पष्ट केले की, न्याय मिळेपर्यंत ते सतत पाठपुरावा करणार असून, आवश्यकता भासल्यास मोठ्या आंदोलनाचीही तयारी आहे.ही घटना संपूर्ण परीट-धोबी समाजात संतापाची लाट निर्माण करत आहे. समाज बांधवांनी एकजुटीने न्यायासाठी आवाज उठवला आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!