धोबी समाजाचे नेते अरुण धोबी यांनी समाजाचा निराधार महिलेला मिऴवुन दिला शासकीय योजनेचा लाभ
शिरपुर : शिरपुर तालुक्यातील धोबी समाजाचे नेते, महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडऴ प्रदेश संघटक अरुण धोबी यांनी शासकीय कार्यालयाशी सतत पाठपुरावा करुन समाजाच्या निराधार महिलेस शासकीय योजनाचा लाभ मिऴवुन दिला आहे. शिरपुर तालुक्यातील विखरण येथील समाजाचे कार्यकर्ते कैलास…धोबी यांचे गेल्या 2 वर्षापुर्वी निधन झाले होते. त्यांचा निराधार विधवा पत्नी श्रीमती वंदनाबाई कैलास धोबी या महिलेला महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडऴ प्रदेश संघटक अरुण धोबी यांनी शासकीय योजनाचा लाभ मिऴवुन देण्यासाठी शिरपुर तहसिलदार महेंद्र माऴी व संजय गांधी विभागाशी सातत्याने संपर्क साधुन पाठपुरावा करुन 3 महिन्यातच या योजनेचा लाभ मिऴवुन दिला आहे. शिरपुर तहसिलदार महेंद्र माऴी यांनी दि. 7 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत विधवा महिला म्हणुन दरमहा ₹1,500 (पंधराशे रु) चे आर्थिक सहाय्य योजना मंजुर केले असुन तसेच तहसिलदार महेंद्र माऴी यांनी राष्ट्रीय कुटुंब योजने अंतर्गत श्रीमती वंदनाबाई कैलास धोबी यांना एक रकमी ₹20,000/- (वीस हजार रु) चे अर्थसहाय्य योजनाचा लाभ मंजुर करुन दिला आहे. या दोन्ही योजनेचा लाभ थेट बँक खात्यात जमा केले जाते. महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडऴ प्रदेश संघटक अरुण धोबी यांचा उपस्थित दि. 13 जुलै 2026 रोजी राष्ट्रीय कुटुंब योजना व संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे शिरपुर तहसिलदार महेंद्र माऴी यांचा हस्ते श्रीमती वंदनाबाई कैलास धोबी यांना या दोन्ही योजनाचे मंजुरी पत्र देण्यात आले. यावेऴी धोबी समाजाचे कार्यकर्ते धुऴे परिट (धोबी) सेवा मंडऴ जिल्हा उपाध्यक्ष सुनिल सुर्यवंशी, शिरपुर परिट (धोबी) सेवा मंडऴ माजी शहराध्यक्ष नरेश पवार उपस्थित होते. अरुण धोबी यांनी यापुर्वी समाजातील अनेक पात्र गरजुंना शासकीय योजनाचा लाभ मिऴवुन दिला आहे. या निराधार महिलेला शासकीय योजनाचा लाभ महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडऴ प्रदेश संघटक अरुण धोबी यांनी मिऴवुन दिल्याबद्दल समाजात त्यांचे कौतुक होत आहे. याकामी संजय गांधी निराधार योजना कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.