December 10, 2025 4:29 am

प्रभाग १८  शशिकलाताई महाजनांचा दबदबा कायम जनतेचा एकमुखी पाठिंबा!

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभाग १८  शशिकलाताई महाजनांचा दबदबा कायम जनतेचा एकमुखी पाठिंबा!

 

प्रभाग १८मध्ये सध्या एकच नाव जोरात चालत आहे ते शशिकलाताई महाजन. मनमिळाऊ स्वभाव, सर्वांसाठी समान वागणूक आणि सतत लोकांमध्ये राहून समस्या जाणून घेण्याची त्यांची कार्यपद्धती यामुळे शशिकलाताईंनी प्रभागातील प्रत्येक मतदाराचे मन अगदी जिंकून घेतले आहे. “पर्याय नाही” हे शब्द आज प्रभागातील नागरिक स्वतः उच्चारत आहेत, आणि याचे मूळ कारण म्हणजे शशिकलाताईंची कामावर केंद्रित नेतृत्वशैली.

गेल्या काही वर्षांत प्रभाग १८ मध्ये पायाभूत सुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवत होता. मात्र शशिकलाताईंनी उमेदवारी जाहीर करताच नागरिकांमध्ये नवचैतन्याची लाट उसळली आहे. लाईट, पाणी, रस्ते, गटारी, स्वच्छता अशा मूलभूत समस्यांची त्यांनी सखोल पाहणी केली असून आश्वासन नाही तर थेट काम ही त्यांची भूमिका असल्याने मतदारांमध्ये प्रचंड विश्वास निर्माण झाला आहे. विकासाला अडथळा असणाऱ्या सर्व गोष्टी दूर करण्याची त्यांची तयारी पाहून नागरिक त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत. शशिकलाताई महाजन म्हणजे विकासाची हमी, प्रामाणिक नेतृत्व आणि २४ तास उपलब्ध असलेली सेवाभावी व्यक्ती. प्रभागातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन सर्वसमावेशक विकास करणारं नेतृत्व म्हणजे त्यांचं चित्र नागरिकांच्या मनात घट्ट बसलं आहे. प्रचाराची जोरदार गती, प्रचंड लोकसहभाग आणि सर्व पातळ्यांवरून होत असलेला पाठिंबा पाहता प्रभाग १८ मध्ये विजयाची हवा आधीच शशिकलाताईंच्या बाजूने वाहत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!