प्रभाग 10 मध्ये संजय मराठे यांचा पत्ता गुल! अनेक वर्ष सत्ता भोगून निष्क्रियतेचा संताप, मनीषा मराठे यांच्या उमेदवारीवर वाढला विरोधाचा भडका
अमळनेर : प्रभाग क्रमांक 10 मध्ये गेल्या अनेक वर्षां सत्ता उपभोगली असे संजय मराठे यांच्याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी उसळली आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता, मूलभूत सुविधा कोणत्याही बाबतीत ठळक किंवा उल्लेखनीय काम न झाल्याने प्रभागातील लोक त्रस्त झाले आहेत. “वर्षानुवर्षे फक्त आश्वासने, पण प्रत्यक्ष काम नाही!” असा स्पष्ट स्वभावाचा सूर नागरिक खुलेपणाने व्यक्त करत आहेत. निवडणुकीत या नाराजीचे रुपांतर थेट विरोधात होताना स्पष्ट जाणवत आहे.
संजय मराठे यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना, त्यांच्या पत्नी सौ. मनीषा संजय मराठे यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर हा विरोध आणखी वाढल्याचे दिसत आहे. “ज्यांनी वर्षानुवर्षे काहीच केले नाही, त्यांनी आता पुन्हा प्रतिनिधित्व कसे करावे?” असा मुद्दा नागरिकांनी ठामपणे उपस्थित केला आहे. प्रभागातील अनेक ठिकाणी मनीषा मराठे यांच्या उमेदवारीविरोधात चर्चा वाढत असून, लोक स्पष्टपणे बदलाची मागणी करताना दिसत आहेत.
यातील सर्वात मोठा धक्का म्हणजे संजय मराठे यांच्या स्वतःच्या प्रतिमेमुळेच मनीषाताईंना नुकसान होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या वादग्रस्त कारभाराची छाया आता मनीषा मराठे यांच्या प्रचारावर पडत असून, प्रभागात त्यांच्या विरोधात तिव्र लाट उसळली आहे. वातावरणाचा कल लक्षात घेतल्यास, प्रभाग 10 मध्ये जनतेने यावेळी “काम करणारे नेतृत्व” ठामपणे निवडण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे.