प्रभाग 18 ब मध्ये रूपालीताई शिवदे यांची विजयी विश्वास, तरुण नेतृत्त्वाची जोरदार मागणी.

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभाग 18 ब मध्ये रूपालीताई शिवदे यांची विजयी विश्वास, तरुण नेतृत्त्वाची जोरदार मागणी

 

अमळनेर : रूबजी नगर, शहा आलम नगर, माळीवाडा आणि अमलेश्वर नगर येथे रुपाली विलास शिवदे यांच्या प्रचाराची हवा इतकी जोरात वाहू लागली आहे की, प्रत्येक भेटीत नागरिकांचा उत्साह आणि प्रतिसाद बघून रूपालीताईंचा विजय आधीच निश्चित झाल्याचे भासू लागले आहे. “रूपालीताई म्हणजे काम, तत्परता, प्रामाणिकपणा!” गल्ली–बोळातील प्रत्येक घरातून त्यांच्या नावावर विश्वासाचं शिक्कामोर्तब होताना दिसत आहे.  त्यांच्या छत्री चिन्हाने तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत जनतेच्या मनात आशेचं प्रतीक म्हणून आपली मजबूत ओळख निर्माण केली आहे.

प्रभागात रूपालीताईंना मिळणाऱ्या पाठिंब्याची खरी ताकद म्हणजे त्यांचे वडील पांडुरंग (पांडू) भोई यांनी अनेक वर्षे केलेली अखंड, निश्वार्थ सेवा. कोणतीही समस्या असो पाणी, लाईट, स्वच्छता, घरातील अडचण किंवा वैयक्तिक मार्गदर्शन पांडू भोई यांनी वेळ न पाहता 24 तास तत्परतेने मदत केली, ज्यामुळे त्यांच्या घराण्याला नागरिक अपार सन्मानाने पाहतात. आता नागरिकांना ठाम वाटू लागले आहे की हा सेवाभावी वारसा रूपालीताई आणखी ताकदीने पुढे नेतील. त्यामुळे प्रभाग 18 ब ची जनता आता विकासाचा निर्णय ठामपणे घेताना दिसते. शिक्षित नेतृत्व, महिलांसाठी सबलीकरणाचे धोरण, नागरिकांच्या अडचणीला तत्काळ प्रतिसाद, मूलभूत सुविधा प्रभावीपणे हाताळण्याची क्षमता या सर्व गुणांनी रूपालीताई जनतेच्या मनात पक्क्या बसल्या आहेत. तरुण मतदार त्यांना आधुनिक, निर्णायक आणि कामात तत्पर नेतृत्व म्हणून पाहत आहेत. महिलांना त्यांच्यात सुरक्षितता आणि शक्तीची नवीन उमेद दिसतेय. आणि ज्येष्ठांना वाटते की प्रभागाचा विकास, स्थिरता आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन फक्त रूपालीताई शिवदेच करू शकतात. त्यामुळे रस्त्यावरच्या चर्चा, सोशल कनेक्ट, घराघरातील संवाद आणि सतत वाढणारा लोकसहभाग पाहता एकच निष्कर्ष उमटतो प्रभाग 18 ब मध्ये ‘छत्री’खालीच निर्माण होणार विकासाची सावली; रूपालीताई शिवदे यांचा प्रचंड बहुमताने विजय अपरिहार्य!

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...

‘बाप एक अधिष्ठान’ विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात अमळनेर : प्रा. डॉ. एस. ओ. माळी परिवार, अमळनेर आणि यश पंढरी इंग्लिश क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निबंध स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेत कु. लिना गणेश पाटील हिने प्रथम, कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने द्वितीय, तर कु. साक्षी अशोक बडगुजर हिने तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने प्रथम, कु. गायत्री देविदास पाटील हिने द्वितीय, तर साहिल कैलास भिल याने तृतीय क्रमांक मिळविला. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रकाश पाटील, विजय पाटील, वासुदेव चौधरी, हेमांगी धर्माधिकारी आणि प्रा. स्वर्णदीप राजपूत यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आपल्या वक्तृत्व व लेखनातून ‘बाप’ या नात्याचे महत्त्व मांडण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

error: Content is protected !!