प्रभाग 3 मध्ये किरण बहारे यांना महिला–तरुण–ज्येष्ठांचा अभूतपूर्व आशीर्वाद, विजयाचे गणित पक्के
अमळनेर : प्रभाग क्रमांक 3 मध्ये कृष्णा रामसिंग बहारे उर्फ किरण भाऊ बहारे यांच्या प्रचाराला प्रचंड वेग आला असून, परिसरातील महिला भगिनी, तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांकडून त्यांना मिळत आहे जबरदस्त आशीर्वाद. गावोगाव, गल्ली–बोळांमध्ये “किरण भाऊच हवेत!” असा एकमुखी आवाज घुमू लागला आहे. प्रचारादरम्यान त्यांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, प्रभाग 3 चा कल स्पष्टपणे त्यांच्या बाजूला झुकत असल्याचे दिसून येत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागात मूलभूत सुविधांचे काम ठप्प असल्याने नागरिकांत प्रचंड नाराजी होती. रस्ते, स्वच्छता, पाणी, प्रकाशयोजना अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर फक्त आश्वासने मिळाली पण प्रत्यक्ष कामाचा मागमूसही दिसला नाही. या पोकळीवर नेमके बोट ठेवत किरण भाऊ बहारे यांनी नागरिकांशी सातत्याने संवाद साधला आणि “काम करणारे नेतृत्व म्हणजे किरण भाऊ” अशी विश्वासार्ह प्रतिमा घडवली. त्यांच्या कामकाजातील पारदर्शकता आणि थेट लोकांपर्यंत पोहोचण्याच्या पद्धतीमुळे जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.प्रचारादरम्यान मिळणारा आशीर्वाद आणि लोकसहभाग पाहता प्रभाग 3 मध्ये परिवर्तनाची हवा जोरात वाहू लागली आहे. कामात येणारे, गरजेला धावून येणारे आणि नेहमी उपलब्ध असलेले नेतृत्व म्हणून किरण बहारे यांचे नाव गल्लोगल्लीत चर्चेत आहे. नागरिकांच्या अपेक्षा, तरुणांचा उत्साह आणि महिलांचा ठाम विश्वास यामुळे कीरण भाऊ बहारे यांचा विजय निश्चित असल्याचे राजकीय जाणकारही मान्य करत आहेत. प्रभाग क्रमांक 3 मध्ये किरण बहारे यांची आघाडी झणझणीत पद्धतीने स्पष्ट होत आहे.