प्रभाग 13 ब मध्ये सुनिल महाजनांची विराट प्रचार रॅली विजययात्रेची सुरुवा
अमळनेर : प्रभाग क्रमांक 13 ब मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले सुनिल दयाराम महाजन स्वेच्छा सेवा निवृत्त पोलिस हेड कॉन्स्टेबल आणि परिवर्तनवादी तरुण समाजसेवक यांच्या प्रचार मोहीमेला नागरिकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळूते आहे. समस्त माता–भगिनी, तरुण–तरुणी, ज्येष्ठ नागरिक आणि लहान गोपाळांपर्यंत पोहोचत असलेल्या प्रभागात नव्या आशेची लहर निर्माण झाली आहे. अनुक्रमांक 4 चा बॅट चिन्ह जनतेत चांगलाच गाजू लागला आहे.
सुनिल महाजन यांच्या प्रामाणिक कार्यशैलीला आणि पोलीस सेवेतल्या अनुभवाला नागरिकांचा ठोस प्रतिसाद मिळत असून, “नवपरिवर्तनासाठी सुनील महाजनच हवेत” असा नागरिकांचा आवाज जोर धरत आहे. प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या महाजनांनी सर्व मतदारांना आवाहन केले आहे की, आपल्या अमूल्य मताचा आशीर्वाद देऊन त्यांना विजयी करावे. प्रभाग 13 ब मध्ये केवळ प्रचार नसून जनतेच्या विश्वासाची आणि परिवर्तनाच्या संकल्पाची विजययात्रा ठरत असल्याची चर्चा जोरात आहे.