प्रभाग 17 मध्ये दिशाभूल करणाऱ्यांना धडा; वातावरणाचा कल दिसू लागला म्हणजे भावनाताई सोनार येताय पुढे
अमळनेर : प्रभाग क्रमांक 17 मध्ये भावना कैलास विसपुते सोनार यांचा धडाका दिवसेंदिवस वाढत असून, अनेकांना घरबसल्या विचार करायला लावणारा वातावरणाचा कल दिसू लागला आहे. वर्षानुवर्षे विकासाचे स्वप्न दाखवून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्यांवर आता प्रचंड नाराजी आहे. कारण प्रत्यक्ष कामाचा अनुभव शून्य असल्याने जनतेचा विश्वास ढासळत चालला आहे. याउलट, प्रभागासाठी सातत्याने काम करणाऱ्या भावनाताई विसपुते सोनार यांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता त्यांचा विजय निश्चित असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
भावनाताई सोनार यांनी प्रभागातील रस्ते, पाणी, स्वच्छता, महिला-सुरक्षा, ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा यावर थेट लोकांमध्ये जाऊन काम केले. प्रभागातील तरुण, महिला, वृद्ध, कामगार व विविध समाजातील नागरिक त्यांना उघडपणे पाठिंबा देत आहेत. प्रभागात दारूचे ठेके उघडण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना नागरिकांनी घरचा जावई दाखवल्यासारखे प्रत्युत्तर दिले आहे. “विकास हवा तर भावनाताई हव्यात” हा जनतेचा आवाज आता गल्ली-बोळांत घुमताना दिसतो.निवडणूक जवळ येताच नागरिक एकदिलाने आवाहन करत आहेत की, प्रभाग 17 च्या सर्वांगीण विकासासाठी भावनाताई सोनार यांचीच निवड ही काळाची गरज आहे. दिशाभूल करणाऱ्या आश्वासनांना जनता कंटाळली असून, आता काम करणारे नेतृत्व मिळावे यासाठी नागरिक स्वतःहून प्रचारात उतरले आहेत. परिसरातील चर्चेनुसार, भावनाताई विसपुते सोनार यांची आघाडी ठाम असून, प्रभाग 17 मध्ये परिवर्तनाची लाट उसळली आहे.