प्रभाग 15 मध्ये प्रशांत निकम यांचा दबदबा! विकासाच्या वाटचालीला नागरिकांचा ठाम पाठिंबा.
अमळनेर : प्रभाग क्रमांक 15 मध्ये प्रशांत मनोहर निकम यांचे वर्चस्व यंदाही घट्ट असल्याचे चित्र सर्वत्र दिसत असून, निवडणूक जवळ येताच परिसरात नवचैतन्याची लहर जाणवत आहे. स्थानिक नागरिकांत प्रशांत निकम यांच्याबद्दलचा विश्वास अधिक बळकट झाला असून, त्यांच्या नावाचा उच्चार होताच “विकास करणारा नेता” अशी प्रतिमा स्पष्ट दिसते. गेल्या काही वर्षांत प्रभागात केलेल्या कामांमुळे व लोकसंग्रहाच्या बळावर निकम यांचा विजय निश्चित असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
प्रशांत निकम यांनी रस्ते–खांब–पाणीपुरवठा यासारख्या मूलभूत सुविधांवर भर देत, प्रत्यक्ष लोकांमध्ये राहून अनेक समस्या सोडवल्या. प्रभागातील नव्या पिढीला रोजगाराविषयी मार्गदर्शन, ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्धता, महिला सुरक्षेचे उपक्रम, सामाजिक बांधिलकी या सर्व क्षेत्रांत प्रशांत निकम यांनी दाखवलेल्या कर्तव्यनिष्ठतेला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे प्रभाग 15 मध्ये निकम यांचे नेतृत्व ही विकासाची खात्री अशी धारणा अधिक मजबूत झाली आहे. निवडणूक वातावरण तापत असताना, प्रतिस्पर्ध्यांकडून प्रयत्न सुरू असले तरी प्रभागातील जनमत स्पष्टपणे प्रशांत निकम यांच्या बाजूने कलंडताना दिसते. “काम करणाऱ्यांनाच मत” तर विनोद कदम यांना यावेळी घरी पाठवणार हा आवाज रस्त्यांवरून थेट उमेदवारापर्यंत पोहोचत आहे. नागरिकांच्या नजरेत प्रशांत निकम हे प्रामाणिक, सक्रिय आणि उपलब्ध नेतृत्व असल्याने त्यांच्या विजयाची गणिते आजच घट्ट होताना दिसत आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक 15 मध्ये प्रशांत निकम यांची विजय निर्विवाद असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.