December 10, 2025 4:11 am

बारामती, फलटण आणि महाबळेश्वरसह राज्यातील एकूण दहा नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; नव्या वेळापत्रकानुसार मतदान २० डिसेंबरला

अपनी भाषा में पढ़े! Translate

बारामती, फलटण आणि महाबळेश्वरसह राज्यातील एकूण दहा नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; नव्या वेळापत्रकानुसार मतदान २० डिसेंबरला

बारामती/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने बारामती, फलटण आणि महाबळेश्वरसह राज्यातील एकूण दहा नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचे अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. बारामतीतील नगराध्यक्ष पदासह सात प्रभागांतील उमेदवारांविरोधात दाखल झालेल्या याचिका जिल्हा न्यायालयात प्रलंबित आहेत. न्यायालयाने या याचिका निकाली काढण्यासाठी अतिरिक्त आठ दिवसांचा कालावधी मागितल्याने नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचा आधार घेत निवडणूक आयोगाने संपूर्ण प्रक्रिया स्थगित केली.

🗳️ नवीन मतदान तारीख — २० डिसेंबर

पूर्वी २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला मतमोजणी होणार होती. मात्र आता तिन्ही नगरपरिषदांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान, तर २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

🔹 नवीन निवडणूक कार्यक्रम

४ डिसेंबर – कार्यक्रम जाहीर

१० डिसेंबर – उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख

११ डिसेंबर – अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप

२० डिसेंबर – मतदान

२१ डिसेंबर – मतमोजणी व निकाल

🟤 नवीन उमेदवारांना संधी नाही

नवीन वेळापत्रक जाहीर झाले असले तरी कोणालाही नव्याने नामनिर्देशन दाखल करता येणार नाही. फक्त नगराध्यक्ष पद आणि प्रभाग क्रमांक ८ ब, ११ ब, १३ ब, १५ ब, १७ अ, १९ ब या प्रभागांसाठीच पुन्हा छाननी व अर्ज मागे घेण्याची संधी दिली जाणार आहे. इतर प्रभागांत कोणताही बदल होणार नाही.

🟢 खर्चाच्या मुदतीत वाढ

नगराध्यक्ष पद आणि वरील सहा प्रभागांतील उमेदवारांना निवडणूक खर्चाची मुदत वाढवण्यात येणार आहे. इतर प्रभागांतील उमेदवारांसाठी मात्र ही सुविधा उपलब्ध नाही.

🔴 आठ नगरसेवकांची बिनविरोध निवड कायम

आतापर्यंत बिनविरोध निवडून आलेल्या आठ नगरसेवकांच्या निवडीवर या बदलाचा परिणाम होणार नाही. त्यांच्या प्रभागांत केवळ नगराध्यक्ष पदासाठीच मतदान होईल.

🟠 राजकीय वातावरण तापले

निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलल्याने बारामती, फलटण आणि महाबळेश्वरमध्ये राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून प्रचार धोरणात बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे.

🔸 दहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित

बारामती, फलटण आणि महाबळेश्वरसह दहा नगरपरिषद–नगरपंचायतींच्या निवडणुका न्यायालयीन अपीलांमुळे थांबवल्या आहेत. यामध्ये मंगळवेढा, यवतमाळ, कोपरगाव, देवळाली प्रवरा, नेवासा, पाथर्डी आणि बाळापूर यांचा समावेश आहे. आधी जाहीर कार्यक्रमानुसार २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला मतमोजणी ठरली होती; परंतु न्यायालयीन याचिकांमुळे आयोगाला संपूर्ण कार्यक्रम रद्द करून नव्याने वेळापत्रक आखावे लागले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!