December 10, 2025 4:41 am

प्रभाग 18(ब) ‘शशिकलाताईंचा शांत स्वभाव आणि लोकांते मिसळन्याचीवृत्ती म्हणजेचं विजयाची शाश्वती विरोधकांची झाली धास्ती!

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभाग 18(ब) ‘शशिकलाताईंचा शांत स्वभाव आणि लोकांते मिसळन्याचीवृत्ती म्हणजेचं विजयाची शाश्वती विरोधकांची झाली धास्ती!

 

अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 18(ब) मध्ये शशिकला ताई महाजन यांच्या उमेदवारीने अक्षरशः राजकीय मापदंड बदलली आहे. प्रभागात एकच आवाज घुमू लागला  “शशिकलाताईंचा विजय पक्काच!” नागरिकांच्या नजरेत त्या फक्त उमेदवार नसून विकासाची खात्री बनल्या आहेत. त्यामुळे प्रभागात विरोधकांचे गणित कोसळू लागले आहे आणि शशिकलाताईंचा प्रभाव पाहून अनेकांना धास्ती बसली आहे.

भागवत भाऊ आणि आकाश माळी यांनी गेली अनेक वर्षे प्रभागात केलेल्या सततच्या समाजसेवेचा ठसा इतका मजबूत आहे की शशिकलाताईंच्या पाठिशी संपूर्ण प्रभाग एकसंघ दिसू लागला आहे, सामाजिक मदत, महिलांसाठी मार्गदर्शन, तरुणांसाठी संधी निर्माण करणे अशा विविध माध्यमातून नागरिकांना हात देण्याचे काम त्यांच्याकडून सातत्याने झाले. त्याच सेवाभावी वारशातून शशिकला ताईंनी प्रभागात अशी हवा निर्माण केली आहे की त्यांच्या बाजूने उभे राहणे म्हणजे विकासाची हमी असल्याची मतदारांना ठाम खात्री पटली आहे.

सध्या प्रभाग 18(ब) मध्ये एकच जंगी चर्चा… “शशिकलाताईशिवाय पर्याय नाही!” मतदार स्वतःहून पुढे येऊन सांगत आहेत  “आम्हाला विकासासाठी दिवस-रात्र उपलब्ध राहणारे नेतृत्व हवे. ते नेतृत्व म्हणजे शशिकला ताई!” महिलांपासून ते तरुणाईपर्यंत सर्व स्तरात त्यांना पाठिंबा प्रचंड वेगाने वाढत आहे. प्रभागात निर्माण झालेल्या मतदारांच्या या प्रचंड उत्सुकतेमुळे  विरोधक हतबल झाले असून आगामी निकालात 18(ब) संपूर्णपणे शशिकलाताईंच्या नावाने झळकणार, अशी शाश्वती नागरिकांनी आधीच देऊन टाकली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!