दौंड मध्ये कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न उमेदवाराचा फ्लेक्स फाडल्याने परिसरात तणावाचे वातावरण.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
84 46 11 91 58
दौंड नगरपरिषदेवर कोण सत्ता मिळवणार दौंड नगरपालिकेची निवडणूक रणधुमाळी चालू असताना प्रभाग 7 मध्ये काही खोडसाळ वृत्तीच्या व्यक्तीनी नागरीक हित संरक्षण मंडळ, आणि मित्रपक्ष आघाडीच्या उमेदवारांचा फ्लेक्स फाडल्याने परिसरात एकमेकांकडे संशयास्पद नजरेने पाहिले जात आहे यामुळे परिसरात शांतता भंग झाल्याचे दिसत आहे. कवाडे गटाचे पुणे जिल्हा युवा अध्यक्ष (पीआरपी )अमित सोनवणे यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे तसेच आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दौंड पोलिसांना पक्षाच्या वतीने निवेदनातून दिला. प्रभाग क्रमांक सात आघाडीच्या उमेदवारांचा बॅनर फाडून त्याच्यावर इतर पक्षाचे चिन्ह चिकटविण्याचा प्रकार घडला आहे, हा प्रकार कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा आहे. आणि निवडणूक काळात तणाव निर्माण करणारा आहे अशा प्रकारामुळे शांततेला बाधा पोहोचण्याची शक्यता आहे.
यापुढे अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी संबंधित ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवावी. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती पाऊले उचलावीत. त्यामुळे या प्रकरणाचा तत्काळ तपास करून दोषींवर आवश्यक ती कडक कारवाई करण्यात यावी.असे पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.