प्रभाग क्रमांक 10(अ) मध्ये श्याम भाऊ बागुल यांची दमदार एन्ट्री; सेवाभावाचा 20 वर्षांचा वारसा
अमळनेर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10(अ) मध्ये शामकांत देविदास चौधरी उर्फ श्याम भाऊ बागुल यांनी उमेदवारीची अधिकृत घोषणा करताच प्रभागात चर्चा आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. 2001 पासून आजपर्यंत त्यांच्या कुटुंबाने प्रभागात घेतलेला सेवाभावाचा वसा नागरिकांच्या मनात खोलवर घर करून आहे. आशा किरण बागुल यांच्या यशस्वी कारकीर्दीनंतर, त्यांची माता सुशीलाबाई देविदास चौधरी यांनीही प्रभागाचा विश्वास जिंकत निवडून येत सेवा केली. या सातत्यपूर्ण सामाजिक योगदानामुळे बागुल कुटुंबाचा प्रभावी राजकीय वारसा आजही प्रभागात दृढपणे टिकून आहे.
कोरोना काळात केलेल्या मदतीची मोठी दखल; नागरिकांच्या प्रत्येक अडचणीत बागुल कुटुंब पुढे होते.
कोरोना संकटाच्या सर्वात कठीण काळात नागरिकांना धावून जाऊन मदत करणारे हात म्हणजे किरण बागुल याची आजही प्रभागात मोठ्या आदराने आठवण केली जाते. त्यांच्या कुटुंबाने केलेल्या सहकार्यामुळे प्रभाग 10(अ) मधील जनता त्यांच्यावर प्रचंड विश्वास ठेवते. या पार्श्वभूमीवर श्याम भाऊंची उमेदवारी जाहीर होताच नागरिकांमध्ये” इत्साह निर्माण झाला आहे.
मनमिळाऊ स्वभाव, संपर्कात राहणारे नेतृत्व प्रभागात श्याम भाऊंच्या पाठिंब्याची प्रभागातील सामान्य माणसाला सहज भेटणारे, कोणतीही अडचण सांगितली की तत्काळ धावून जाणारे आणि मनमिळाऊ स्वभावासाठी प्रसिद्ध असलेले श्याम भाऊ बागुल यांची लोकांत वेगळीच ओळख आहे. कोणत्याही समाजवर्गाला न दुखवता सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची पद्धत प्रभागात लोकप्रिय आहे. आगामी निवडणुकीत “सेवा हा धर्म आणि विकास हीच दिशा” या त्यांच्या भूमिकेमुळे प्रभाग 10(अ) मध्ये श्याम भाऊंना प्रचंड जनसमर्थन मिळत असल्याचे चित्र स्पष्टपणे जाणवत आहे.