प्रभागात शशिकांला ताई महाजन यांचा विकासाचावादा; भव्य योजनांचा रोडमॅप जाहीर प्रभाग होणार सुजलम सुफलाम

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभागात शशिकांला ताई महाजन यांचा विकासाचावादा; भव्य योजनांचा रोडमॅप जाहीर प्रभाग होणार सुजलम सुफलाम

 

अमळनेर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर..

शशिकांला ताई महाजन यांनी प्रभागासाठी थेट विकासाचा दणकट आराखडा जनतेसमोर ठेवत प्रचाराला दमदार सुरुवात केली आहे. झांमी चौक ते संत सावता माळी प्रवेशद्वार, खंडोबा मंदिर रस्ता, माळीवाडा परिसरातील महात्मा फुले–सावित्रीबाई फुले स्मारक अशी एकापेक्षा एक महत्त्वाची कामे करून दाखवण्याचा निर्धार ताईंनी जाहीर केला आहे. प्रभागातील विविध वस्तींसाठी वेगवेगळे, जनतेच्या थेट उपयोगाचे प्रकल्प ताईंनी हाती घेतले आहेत. रूबजी नगर ते शहाआलमपर्यंत एकाच वेळी विकास स्मारके, मोठे प्रवेशद्वार, सभागृह आणि काँक्रीट रस्त्यांची मोठी योजना ही त्यांच्या मनात आहे. रूबजी नगर भागात वीर एकलव्य व महर्षी वाल्मीक ऋषी यांचे स्मारक, तर अमलेश्वर नगरात भव्य आकर्षक प्रवेशद्वार उभारण्याचा ताईंचा मानस आहे. शहाआलम परिसरात वातानुकूलित मुस्लीम सभागृह, पक्के काँक्रीट रस्ते व जलनिस्सारणाची व्यवस्था या सर्व घोषणा पाहता ताईंनी प्रत्येक समाज, प्रत्येक गल्ली आणि प्रत्येक मतदाराच्या गरजा नीट अभ्यासल्या असल्याचे स्पष्ट जाणवते.

“आम्ही हे करणारच!” या ठाम भूमिकेमुळे प्रभागात ताईंच्या संकल्पनांना मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो.

‘राजकारणासाठी नाही, समाजकारणासाठी’ शशिकांला ताईंचा मंत्र; प्रभागात बदलाचा जोर धरत आहे. ताईंनी सादर केलेला वाचननामा हा फक्त घोषणांचा कागद नसून प्रत्यक्ष कामाची शपथ असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. “राजकारणासाठी नाही तर समाजकारणासाठी” या त्यांच्या भूमिकेला महिलावर्ग, तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि विविध समाज बांधवांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. जनतेची सेवा हेच ध्येय ठेवून प्रभाग 18 ‘ब’ मध्ये शशिकांला ताई महाजन यांच्या समर्थनाची लाट उभी राहिल्याचे चित्र स्पष्टपणे दिसू लागले आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!