प्रभाग क्र. 17 मध्ये ‘भावनाताईंचा विजय निश्चित’; अनेकांचे विजयाचे स्वप्न फक्त स्वप्नच ठरणार!

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभाग क्र. 17 मध्ये ‘भावनाताईंचा विजय निश्चित’; अनेकांचे विजयाचे स्वप्न फक्त स्वप्नच ठरणार!

 

अमळनेर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 17 मध्ये सध्या एकच चर्चा जोरात आहे भावना कैलास विसपुते यांचा विजय आता निश्चितच आहे. अनेकांनी विजयाची स्वप्ने रंगवली असली तरी मतदारांची भूमिका अगदी स्पष्ट झालेली दिसते:

“काम करणाऱ्यांनाच जागा!” आपापली स्वप्ने मतदारांवर लादण्याची इच्छा बाळगणाऱ्यांची दिपस्वप्न यावेळी धुळीस मिळणार असल्याचे वातावरण तयार झाले आहे. प्रभागात हवा एकाच दिशेने वाहते आहे ती भावनाताईंच्या ठाम नेतृत्वाकडे. अनेक विक्रांतांची रात्र आणि झोपेतील स्वप्न हे स्वप्नच राहणार.. प्रभाग 17 चा बागडा अनेक मतदारांना बसण्यास येणार कामी भावनाताईंची प्रभागाच्या विकासासाठी शंभर टक्के हमी..

कर्तृत्व, प्रामाणिकता आणि महिलांच्या सबलीकरणासाठी लढणारी एकनिष्ठ उमेदवार मतदारांचा दृढ विश्वास अश्या भावना ताई विसपुते या केवळ उमेदवार नाहीत, तर प्रभाग 17 मध्ये महिलांचे सबलीकरण, सामाजिक न्याय आणि सर्वांगीण विकासाची एक सातत्यपूर्ण चळवळ आहेत. प्रामाणिक कार्यपद्धती, कर्तव्यनिष्ठ दृष्टिकोन आणि प्रत्येक घराशी जुळलेला संपर्क यामुळे त्यांनी अल्पावधीतच मतदारांचे मन जिंकले आहे. ताई प्रभागातील प्रत्येक समस्येकडे संवेदनशीलतेने पाहतात आणि उपाययोजना त्वरित अंमलात आणतात ही त्यांची वैशिष्ट्ये आता जनतेचा सर्वात मोठा विश्वास बनली आहेत. प्रभागाला दिशा देणारे नेतृत्व कोण? याचे उत्तर मतदार Determined आवाजात देत आहेत: भावना ताई!

दारू-मटन, पैशांचे प्रलोभन ठरणार फेल; प्रभागाचा ‘विकास करणारी उमेदवार म्हणजे भावना ताईच!’

प्रभागात काही घटकांनी दारू, मटन आणि पैशांच्या आधारावर मतदारांची मने फिरवण्याचे प्रयत्न केले असले तरी प्रभाग 17 मधील नागरिकांनी मतदारांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे “या वेळेस पोटभऱ्याच्या मेजवानीवर नव्हे, तर विकासाच्या कामावर मत देणार!” सर्व समाजघटकांमध्ये भावना ताईंविषयी निर्माण झालेल्या प्रामाणिक आदरामुळे प्रभागात त्यांच्या समर्थनाची लाट मोठ्या वेगाने वाढू लागली आहे. या निवडणुकीत प्रभाग 17 एकच आवाज देणार कर्तृत्ववान आणि स्वच्छ प्रतिमेच्या भावना कैलास विसपुते यांनाच विजयी करणार!

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!