धक्कादायक! शेवटचा व्हिडिओ: “आई, मला माफ कर”  प्रेमभंगामुळे विद्यार्थ्याची आत्महत्या; समाजमन हादरले..

अपनी भाषा में पढ़े! Translate

धक्कादायक! शेवटचा व्हिडिओ: “आई, मला माफ कर”  प्रेमभंगेमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या; समाजमन हादरले..

 

मार्मिक न्यूज नेटवर्क : अमळनेर

“सॉरी मम्मी… मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही” अशा हृदयद्रावक शब्दांनी सुरू होणारा शेवटचा व्हिडिओ रेकॉर्ड करून गौरव बोरसे या १९ वर्षीय विद्यार्थ्याने अमळनेर शहरातील क्रीडा संकुलातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून समाजमन हादरले आहे. गौरव हा गंधली पिळोदे येथील रहिवासी असून त्याने प्रेमभंगातून आलेल्या नैराश्यामुळे त्याने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. व्हिडिओत गौरवने आपल्या आई-वडिलांची माफी मागताना भावनिक क्षण टिपले असून तो इतर विद्यार्थ्यांना सांगतो – “मी कमजोर आहे… पण तुम्ही असा निर्णय घेऊ नका!” “प्रेमात अपयश आलं म्हणून शिक्षण आणि आयुष्य संपवू नका… आई-वडिलांचे पैसे आणि कष्ट वाया घालवू नका.”

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेने तरुणाईतील मानसिक आरोग्याबाबतचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पालक, शिक्षक आणि समाज यांना याप्रसंगी सजग राहण्याची गरज आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!