‘मार्मिक’च्या बातमीची दखल घेतली, आता कारवाई होणार का? टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर नागरिकांचा रोष

अपनी भाषा में पढ़े! Translate

‘मार्मिक’च्या बातमीची दखल घेतली, आता कारवाई होणार का? टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर नागरिकांचा रोष

 

अमळनेर  : विक्की जाधव 

शहरात वाढलेल्या डेंग्यू रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ‘मार्मिक’ ने केलेल्या ठोस वृत्तांकनाची अखेर प्रशासनाने दखल घेतली. जिल्हा हिवताप अधिकारी थेट अमळनेरात दाखल झाले, पाहणी झाली असे समजते, उपाययोजना सुरू झाल्या – मात्र आता एक मोठा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत – जे अधिकारी आणि कर्मचारी आजवर निष्क्रीय होते, कामात दिरंगाई करत होते… त्यांच्यावर कारवाई होणार का?

डेंग्यूचे रुग्ण आढळून आले असतानाही, काही विभागीय कर्मचारी आणि अधिकारी वारंवार सूचना असूनही तपासणीस गेले नाहीत, फवारणी केली नाही, तसेच कंटेनर सर्वेक्षणास टाळाटाळ केली. या हलगर्जीपणामुळेच परिस्थिती गंभीर बनली, असा आरोप स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. निव्वळ पाहणी करून, फोटो काढून, अहवाल सादर करून प्रशासन मोकळं होणार का? की जे अधिकारी फक्त फाईल ढकलण्यापुरतेच आपली जबाबदारी पार पाडतात, त्यांच्या कामाचा लेखाजोखा घेतला जाईल?

या पार्श्वभूमीवर काही कर्मचारी “माझं काम नाही”, “मी त्या प्रभागात नाही”, “कोणीतरी दुसरं बघेल” अशा पळवाटी उत्तरांनी जबाबदारी झटकताना दिसले. हाच मुद्दा नागरिकांच्या रोषाचे कारण ठरत आहे.

कामाचा आळस – जबाबदारीची चूक – आणि त्याचा फटका सामान्य जनतेला!

‘मार्मिक’ ने हे वास्तव अधोरेखित केल्यानंतरच यंत्रणा हलली, ही गोष्ट सर्वश्रुत आहे.

मात्र प्रशासनाने ही केवळ परिस्थिती सुधारण्याची कारवाई मानू नये, तर ज्यांनी कामचुकारपणा केला, त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी आणि योग्य कारवाई करावी, अशी मागणी आता तीव्र होत आहे.

“जे वेळेवर पुढे आले नाहीत, ते दोषमुक्त कसे ठरू शकतात?” – असा सवाल समाजातून पुढे येत आहे.

‘मार्मिक’च्या बातमीने कार्यवाहीस चालना दिली – आता पुढचा टप्पा आहे जबाबदारी निश्चित करणे आणि दोषींवर कारवाई करणे. तसं झालं, तरच ही बातमी प्रशासनाला जागवणारी आणि बदल घडवणारी ठरेल!

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!