श्रावण महिन्यात कपिलेश्वर मंदिरात पंचदिवसीय रुद्राभिषेक अनुष्ठान
मुडावद-निंब ता. अमळनेर : विक्की जाधव
पवित्र श्रावण महिन्यानिमित्त श्री क्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिरात पाच दिवसीय शास्त्रशुद्ध रुद्राभिषेक अनुष्ठानाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १६ ऑगस्ट २०२५ ते २० ऑगस्ट २०२५ या कालावधीत दररोज सकाळी ८ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत हा भक्तिमय सोहळा पार पडणार असून, अकरा भूदेवांच्या वेदघोषात श्री शंकराची महापूजा होणार आहे. या अनुष्ठानाचे मार्गदर्शन आणि प्रमुख उपस्थिती महामंडलेश्वर स्वामी हंसानंदतीर्थ महाराज यांची असून, या काळात शिवभक्तांना अध्यात्मिक समाधान आणि वैयक्तिक जीवनात सौख्य लाभावे, हा उद्देश ठेवण्यात आला आहे. सर्व भाविकांनी आपापल्या घरातील शिवपिंड व पूजन साहित्य घेऊन वेळेवर मंदिरात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अभिषेकानंतर मंदिरातच महाप्रसादाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या अनुष्ठानाची सांगता दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ ते ११ दरम्यान होणार असून, यावेळी स्वामी हंसानंदतीर्थ महाराज यांचे मंगल प्रवचन आणि त्यानंतर दुपारी १२ ते २ दरम्यान महाप्रसाद होणार आहे.
सूचना :
लांबून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी मंदिरात राहण्याची, जेवणाची आणि स्नानाची व्यवस्था करण्यात आली असून, त्यांना आंघोळीचे कपडे, आंथरूण-पांघरूण घेऊन यावे लागेल, असे मंदिर ट्रस्टतर्फे कळविण्यात आले आहे.
अधिक माहिती साठी :श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट, मुडावद-निंब
संपर्क: 9421704934 / 8308327770 / 9764858676 / 7987860194 / 7498990773
