“महापुरुषांचा पुतळा अतिक्रमणात गुदमरतोय – भंगारात अडकला आंबेडकर चौक – हेच का स्मारकांचं रक्षण?

अपनी भाषा में पढ़े! Translate

“महापुरुषांचा पुतळा अतिक्रमणात गुदमरतोय – भंगारात अडकला आंबेडकर चौक – हेच का स्मारकांचं रक्षण?

 

“महापुरुषांचा अपमान थांबवा – अतिक्रमण हटवा!”

अमळनेर : विक्की जाधव 

माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रयत्नाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्णाकृती पुतळ्याचा अभिमान अमळनेर शहराला असताना, आंबेडकर चौक परिसरात वाढलेल्या अतिक्रमणामुळे परिसराची शान मलीन होत आहे.

या चौकात खुलेआम ताडी दुकाने, आमलेट पाव, तळलेले मटण विक्रीची अवैध दुकाने तसेच पुतळ्याच्या मागील बाजूस भरलेला भंगार बाजार – हे सर्व प्रकार चौकातील पवित्रतेला आणि शिस्तबद्धतेला काळिमा फासत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांवर श्रद्धा असलेल्या तमाम सुजाण नागरिकांनी अमळनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करत हा संताप मांडला. अतिक्रमण तत्काळ हटवून चौक पवित्र ठेवावा, अशी ठाम मागणी केली आहे.

“अतिक्रमण हटवले नाही, तर रस्त्यावर उतरू”

निवेदनात सुचवले आहे की प्रशासनाने याबाबत तत्काळ पावले उचलली नाहीत, तर तमाम आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरेल आणि यामुळे उद्भवणाऱ्या परिणामांना प्रशासन जबाबदार राहील.

प्रशासन आता जागे होते का, की आंदोलकांना रस्त्यावर उतरावे लागते – याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!