बांबू लागवड योजनेत ३६ हजारांची लाच – वन विभागाच्या अधिकाऱ्यासह तिघे जाळ्यात

अपनी भाषा में पढ़े! Translate

बांबू लागवड योजनेत ३६ हजारांची लाच – वन विभागाच्या अधिकाऱ्यासह तिघे जाळ्यात

 

मार्मिक न्यूज नेटवर्क : जळगाव 

शेतजमिनीत बांबू लागवड योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वन परिक्षेत्र अधिकाऱ्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) जळगाव यांनी रंगेहात पकडले. ही कारवाई आज पारोळा येथील सामाजिक वनीकरण कार्यालयात करण्यात आली.

पकडलेले आरोपी : मनोज बबनराव कापूरे (54) – वन परिक्षेत्र अधिकारी, पारोळा (अति. कार्यभार – अमळनेर) निलेश मोतीलाल चांदणे (45) – लिपिक, सामाजिक वनीकरण कार्यालय, पारोळा. कैलास भरत पाटील (27) – कंत्राटी चालक, मोरफळ, ता. पारोळा

प्रकरण असे घडले:

तक्रारदार हे शेतकरी असून, सडावण शिवारातील स्वतःच्या व नातेवाईकांच्या जमिनीवर अमृत महोत्सवी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत बांबू लागवड करायची होती. संबंधित योजनेसाठी चार फाईल मंजूर करून देण्यासाठी आरोपी कापूरे व चांदणे यांनी प्रत्येकी १० हजार रुपये, एकूण ४० हजार रुपयांची लाच मागितली होती.

तक्रारदाराने ही बाब ACB जळगावकडे तात्काळ कळवली. सापळा रचून पडताळणी केल्यानंतर तडजोडीअंती ३६ हजार रुपयांवर व्यवहार ठरवून कंत्राटी कर्मचारी कैलास पाटील याच्याकडे रक्कम देण्यात आली. त्यावेळी ACBच्या अधिकाऱ्यांनी पंचांसमक्ष तिघांना रंगेहात पकडले असून सदर प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईचे नेतृत्व:

या कारवाईचे पर्यवेक्षण श्री. योगेश ठाकूर (उपविभागीय पोलीस अधिकारी, ACB जळगाव) यांनी केले असून, श्री. हेमंत नागरे (पोलिस निरीक्षक) हे तपास अधिकारी आहेत.

मार्गदर्शन – मा. श्री. भारत तांगडे (पोलिस अधीक्षक, ACB नाशिक) आणि मा. माधव रेड्डी (अप. पोलिस अधीक्षक, नाशिक विभाग) यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!