डेंगू च्या रुग्णांमध्ये वाढ सुरूच प्रशासनाचे दुर्लक्ष. की सुस्त झोपेत 

अपनी भाषा में पढ़े! Translate

 डेंगू च्या रुग्णांमध्ये वाढ सुरूच प्रशासनाचे दुर्लक्ष. की सुस्त झोपेत 

 

अमळनेर : विक्की जाधव 

अमळनेर शहरात डेंगू व इतर साथीचे रोग झपाट्याने वाढत असतानाही, नगरपालिका प्रशासन आणि मुख्याधिकारी तुषार नेरकर यांचे सौम्य वागणे नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे का, असा थेट सवाल निर्माण झाला आहे. शहरातील विविध वसाहतींमध्ये डेंगूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना, अद्याप ना फवारणी, ना स्वच्छता मोहिम, ना डास निर्मूलन – केवळ प्रशासकीय मौन!

मुख्याधिकारी तुषार नेरकर हे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत का? असा संतप्त सवाल आता सामान्य जनतेकडून विचारला जात आहे.

शहरातील उघड्या जागा, गटारी, मोकळी मैदानं, सार्वजनिक ठिकाणी साचलेले पाणी आणि कचऱ्याचे ढीग यामुळे डासांचा प्रचंड उपद्रव सुरू आहे. यामुळे संपूर्ण शहरात रोगराईचे संकट निर्माण झाले आहे.

   “दरवर्षी सारखीच परिस्थिती, पण यंदा तरी प्रशासन जागं होणार का?” असा रोष सोशल मीडियावरही व्यक्त होऊ लागला आहे.

अमळनेर न.पा. प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर ही निष्क्रियता जीवघेणी ठरू शकते, अशी भीती आता आरोग्य क्षेत्रातही व्यक्त होत आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!