प्रभाग क्रमांक १२ : सुयोग ज्ञानेश्वर धनगर यांच्यावर वाढता जनविश्वास 

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभाग क्रमांक १२ : सुयोग ज्ञानेश्वर धनगर यांच्यावर वाढता जनविश्वास 

कोरोनात, नानाने केलेल्या जनसेवेची शिदोरी सुयोगला देणार बाळकडू 

अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 12 मध्ये तरुण आणि ऊर्जावान नेतृत्व म्हणून सुयोग ज्ञानेश्वर धनगर यांचे नाव ठळकपणे पुढे येत आहे. कोरोना काळात जनतेसाठी अहोरात्र धावपळ करणारे नाना धनगर यांच्या सेवाभावी परंपरेचा वारसा सुयोग धनगर यांनी पुढे नेण्याचा निर्धार केला आहे. कुटुंबाची समाजसेवेची ओळख आणि तरुणाईची जिद्द यांच्या बळावर सुयोग भाऊ जनतेत जलद गतीने लोकप्रिय होत आहेत.

प्रभागातील समस्या, विकासाचे प्रलंबित प्रश्न आणि नागरिकांच्या रोजच्या अडचणी समजून घेण्यासाठी सुयोग धनगर सातत्याने घराघरात जाऊन संवाद साधत आहेत. नागरिकांच्या अपेक्षा समजून घेऊन “विकास, पारदर्शकता आणि तत्पर सेवा” हा आपला मूलमंत्र असल्याचे ते सांगतात. तरुण नेतृत्वात कार्य करण्याची ऊर्जा आणि अनुभवी घराण्याचा पाठिंबा यामुळे त्यांच्याकडून प्रभागातील नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत. धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन निवडणूक रिंगणात उतरलेले सुयोग धनगर हे सकारात्मक विचारांवर व लोकाभिमुख कामांवर विश्वास ठेवणारे उमेदवार म्हणून ओळखले जात आहेत.

“नाना धनगर यांची समाजसेवेची परंपरा, आणि सुयोग भाऊंची प्रामाणिकता व तरुणाईचा उत्साह

या दुहेरी बळावर प्रभाग क्रमांक 12 मध्ये विकासाची नवी दिशा दिसणार,” असा विश्वास नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!