पंडित नेहरू विद्यालयात नाविन्यपूर्ण पद्धतीने रक्षाबंधन उत्साहात..
अमळनेर : विक्की जाधव.
पंडित नेहरू सहकारी शेती विद्यालय, नवलनगर ता. जि. धुळे येथे ३१ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण नाविन्यपूर्ण पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला.

विद्यार्थ्यांमध्ये बहीण-भावाच्या प्रेमासोबतच आपुलकी, स्नेह, संरक्षण आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत एकमेकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत बंधुभावाचा संदेश दिला.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सी. ए. पाटील, पर्यवेक्षक जी. पी. देसले, उपशिक्षक आर. एम. पाटील, राहुल सूर्यवंशी, आर. एस. ठाकरे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा संस्कारक्षम उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी भावना व्यक्त केली.