गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमळनेरात आज शांतता समितीची बैठक

अपनी भाषा में पढ़े! Translate

Screenshot_2026-09-01-11-00-34-05_40deb401b9ffe8e1df2f1cc5ba480b12

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमळनेरात आज शांतता समितीची बैठक

पोलीस प्रशासनाकडून नियोजनावर भर; पत्रकारांसह गणेश मंडळांचे पदाधिकारी व मान्यवरांची उपस्थिती.

 

अमळनेर : विक्की जाधव.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था, शांतता आणि उत्सवाचे नियोजन याबाबत चर्चा करण्यासाठी अमळनेर पोलिसांकडून शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आज मंगळवार, दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता वाणी मंगल कार्यालय, पवन चौक, अमळनेर येथे ही बैठक होणार आहे.

IMG-20260901-WA0605

या बैठकीस जळगावचे पोलीस अधीक्षक व चाळीसगावचे अपर पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली विविध घटक सहभागी होणार आहेत. शांतता समिती सदस्य, गणेश मंडळांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, मोहल्ला कमिटी सदस्य, महिला दक्षता सदस्य, पोलीस पाटील तसेच पत्रकार बांधवांना बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

IMG-20260901-WA0650

गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत पार पडावा, यासाठी प्रशासनाच्या सूचनांसह नागरिक व गणेश मंडळांच्या विविध प्रश्नांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. उत्सव काळात सामाजिक सलोखा, वाहतूक व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अमळनेर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!