श्री मंगळग्रह मंदिर व डॉ. महाले यांच्या बदनामीप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अनंत निकमविरुद्ध सामूहिक तक्रारी..

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260713-WA0803

श्री मंगळग्रह मंदिर व डॉ. महाले यांच्या बदनामीप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अनंत निकमविरुद्ध सामूहिक तक्रारी..

 

अमळनेर : विक्की जाधव.

सोशल मीडियावर श्री मंगळग्रह मंदिर आणि मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्याविषयी न्यायालयाच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावत बदनामीकारक माहिती प्रसारित केल्याचा आरोप करत अनंत रमेश निकम यांच्याविरुद्ध पोलिसांसह प्रशासनाकडे सामूहिक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. डॉ. महाले यांनी याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मंगळवारी धर्मदाय विभागाकडेही पुराव्यांसह तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

फिर्यादीनुसार, 29 जून रोजी निकम यांनी फेसबुक व व्हॉट्सॲपवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये श्री मंगळग्रह मंदिरासंदर्भातील न्यायालयीन निकालाबाबत दिशाभूल करणारी माहिती देत डॉ. महाले यांच्यावर गंभीर आरोप केले. मात्र संबंधित न्यायालयाच्या आदेशात अशा प्रकारचे निष्कर्ष नसताना खोटे संदर्भ देऊन न्यायालयाच्या नावाचा गैरवापर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकारामुळे डॉ. महाले, मंगळग्रह सेवा संस्था आणि मंदिराची समाजात बदनामी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी सकल हिंदू समाज, विविध हिंदुत्ववादी संघटना, व्हॉईस ऑफ मीडिया अमळनेर शाखा तसेच मंगळग्रह सेवा संस्थेचे कर्मचारी आणि परिसरातील व्यावसायिक यांनीही प्रांताधिकारी, पोलीस उपअधीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्याकडे स्वतंत्र निवेदने सादर केली. सामाजिक व धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत निकम यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या निवेदनांत करण्यात आली. प्रांताधिकारी कार्यालयात तक्रारदारांची मोठी उपस्थितीही यावेळी दिसून आली.

दरम्यान, डॉ. महाले यांनी धर्मदाय विभागातील अधिकाऱ्यांशी प्राथमिक चर्चा केली असून न्यायालयाच्या नावाने कथित बनावट प्रसिद्धीपत्रक व सोशल मीडियावरील पोस्टबाबत सर्व पुराव्यांसह अधिकृत तक्रार दाखल करण्याची तयारी केली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे शहरात मोठी चर्चा सुरू असून प्रशासन व पोलिसांकडून पुढील काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया : 

सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, ” चॅरिटीकमिशनच्या  आदेशाची प्रत वाचून दाखवणे हा गुन्हा ठरू शकत नाही. मी संबंधित व्हिडिओ 29 जून रोजी प्रसारित केला होता. त्यानंतर इतके दिवस संबंधित शांत का होते, हा प्रश्न उपस्थित होतो. उलट माझ्याविरोधात दैनिकातून मुख्य पानावर बदनामीकारक वृत्त प्रसिद्ध करून माझी प्रतिमा मलिन करण्यात आली. मी सामाजिक कार्य करत असून माझ्यावर यापूर्वी दाखल झालेले गुन्हे मा. न्यायालयाने निकाली काढत मला निर्दोष मुक्त केले आहे. तसेच दैनिक ‘महातेज’मधून माझ्या सामाजिक प्रतिमेला धक्का पोहोचेल असे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले असून त्यामुळे माझीही मानहानी झाली आहे. या संपूर्ण प्रकरणात माझी बाजू मांडत संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे निकम यांनी मार्मिक सोबत बोलतांना सांगितले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!