अमळनेर वैश्यवाणी (शेटे) समाजाचा गुणवंतांचा गौरव; ९० हून अधिक विद्यार्थ्यांचा सन्मान

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260714-WA0000

अमळनेर वैश्यवाणी (शेटे) समाजाचा गुणवंतांचा गौरव; ९० हून अधिक विद्यार्थ्यांचा सन्मान

 

अमळनेर : विक्की जाधव.

अमळनेर वैश्यवाणी (शेटे) समाज मंडळातर्फे 12 जुलै वार रविवारी सकाळी 11 वाजता शहरातील इंदिरा भवन येथे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी खान्देशातील ९० हून अधिक गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करताना मान्यवरांनी सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त आणि योग्य ध्येय निश्चितीच्या माध्यमातून जीवनात मोठे यश संपादन करण्याचा संदेश दिला.

सोहळ्यात शिवाजी रामदास भदाणे (अमळनेर), चोपडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संजीव शेटे, नाशिक येथील अध्यक्ष गजानन दलाल, सेवानिवृत्त सैनिक शिवदास शेटे, चहार्डी येथील प्रगतशील शेतकरी राजेश शेटे यांनी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले. बदलत्या काळात कौशल्याधारित शिक्षण, स्पर्धा परीक्षा, तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि सामाजिक मूल्यांचे महत्त्व यावर त्यांनी सविस्तर विचार मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश शेटे आणि जान्हवी सोनवणे यांनी प्रभावीपणे केले. अध्यक्ष किरण तायडे आणि संजय शेटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!